हद्दपार सराईत दारू विक्रेती महीला विरूध्द सावंगी पोलीसांची अटकेची कठोर कार्यावाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील पथक हददपार इसम यांना चेक करणे कामी मोहीम राबवीत असतांना मुखबीर कडुन खात्रीशिर माहीती मिळाली कि, वर्धा जिल्हयातून हददपार असलेली सराईत दारू विकेता महीला नामे प्रियंका राकेश काबळे, वय 35 वर्ष, रा. सावंगी मेघे, ता.जि. वर्धा हीला मा. पोलीस अधिक्षक साहेब वर्धा यांनी कलम 55 म.पो.का. अन्वये वर्धा जिल्हयातुन दोन वर्षा करीता हददपार केले असुन सुध्दा सदर महीला ही सक्षम अधिका-याची कोणतीही पुर्व परवानगी न घेता मनाईचे क्षेत्रात तिचे राहते घरी मौजा सावंगी मेघे येथे राहत असुन गावठी मोहा दारूची चोरटयारितीने विकी करीत आहे.
अशा माहीती वरून पंच व पो. स्टॉफ सह तिचे राहते घरी जावुन तिला चेक केले असता ती तिचे राहते घरी हजर मिळुन आली. तसेच तिचे घराची दारू बाबत घरझडती घेतली असता घरझडती मध्ये गावठी मोहा दारू मिळुन आल्याने आरोपी विरूध्दा महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये पो.स्टे. ला अप.क. 794/2025 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयात महिला आरोपी नामे प्रियंका राकेश काबळे, वय 35 वर्ष, रा. सावंगी मेघे, हिला अटक करण्यात आली असून हवालात बंद करण्यात आले आहे. तसेच हद्दपार ईसम यांचेमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर साहेब, यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक श्री पंकज वाघोडे सा, ठाणेदार पोलीस स्टेशन सावंगी मेघे व गुन्हे शोध पथकाचे पो.हवा.अनिल वैद्य, निखील फुटाणे, हर्षवर्धन मून, अमोल जाधव, मपोना शुभागी महाजन यांनी केली.
तरी सावंगी पोलीसांकडुन आव्हान करण्यात येते की, हददपार इसम मिळुन आल्यास सावंगी पोलीस स्टेशन येथे माहीती दयावी.