हातात शस्त्र घेवून दहशत पसरवीणाऱ्या ईसमा विरूध्द सावंगी पोलीसांची जेल दाखलची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि. 10.10.2025 रोजी पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील पथक पेट्रोलींग तसेच गुन्हेगार शोध मोहिम राबवीत असता सावंगी ते पालोती रोडवरील दावत हॉटेलजवळ आम रोडवर सार्वजनिक ठिकाणी एक ईसम आपले हातात धारदार लोखंडी पात्याचा सुरा घेवुन रस्त्याने येणारे जाणारे लोकांना दाखवून दहशत पसरवित असतांना दिसून आला, त्यावरून आरोपी नामे आकाश लक्ष्मन ससाने, वय 32 वर्ष, रा. गिट्टीखदान, वार्ड नं. 6. सावंगी मेघे ता. जि. वर्धा यास पो.स्टाफ चे मदतीने ताब्यात घेवुन त्याचे हातातील एक धारदार लोखंडी पात्याचा चाकु जप्त करून स्टे. ला आरोपी विरूध्द अप.क. 795/2025 कलम 4,25 भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली. नमुद आरोपी यास गुन्हयात अटक करून जेल दाखल करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर साहेब, यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक श्री पंकज वाघोडे सा, ठाणेदार पोलीस स्टेशन सावंगी मेघे व पो.हवा अनिल वैद्य, निखील फुटाणे, हर्षवर्धन मून, अमोल जाधव, यांनी केलेली असून गुन्हयाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अनिल वैद्य हे करीत आहे.