“गांजा अंमली पदार्थाची विक्री करणा-या सराईत गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
मा. श्री. अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 10 ऑक्टोबर 2025 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथक पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीवरून गांजा विक्री करणारा सराईत गुन्हेगार संदिप उर्फ आऊ सिध्दार्थ जनबंधु रा. महात्मा फुले वार्ड हिंगणघाट याचेवर त्याचे राहते घरी एन.डि.पी.एस. कायद्यान्वये रेड केला असता, आरोपीचे घरी तो स्वतः व त्याचा साथीदार जय सतिश भोपळे रा. खंडोबा वार्ड हिंगणघाट असे हजर मिळुन आले असुन, आरोपीचे राहते घराची झडती घेतली असता, एका प्लास्टीक पिशवीमध्ये गांजा अंमली पदार्थ मिळुन आला. सदर गांजाचा माल त्यांनी स्वतः त्याचे होंडा शाईन मोटर सायकल क्र. एम.एच. 32 ए.यु. 3196 ने टेकानाका नागपुर येथे जावुन, तेथे राहणारा आरोपी राजु नावाचा ईसमाकडुन खरेदी केल्याचे निष्पन्न झाल्याने, आरोपीतांचे ताब्यातुन निव्वळ 1 किलो 40 ग्रॅम गांजा अमली पदार्थ, एक मोटर सायकल व दोन मोबाईलसह जु.कि. 1,51,800 रु चा मुद्देमाल जप्त करून, सर्व आरोपीतांविरूध्द पो.स्टे. हिंगणघाट येथे एन.डी.पि.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. विजयसिंग गोमलाडु पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.