ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरुकुंज आश्रम मोझरी येथे सुवर्णाताईंच्या कीर्तनाने सर्वांची मने जिंकली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम मोझरी यांच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथी महोत्सव निमित्त दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी श्री गुरुदेव सेवा मंडळ भद्रावतीच्या महिला कार्यकर्त्या ह.भ.प. सौ. सुवर्णा प्रकाश पिंपळकर यांनी अत्यंत प्रभावी आणि प्रेरणादायी कीर्तन सेवा सादर केली. त्यांच्या कीर्तनाने सर्वांची मने जिंकली आणि भद्रावतीच्या शिरोपेच्यात मानाचा तुरा रोवला.

“अब साधन बदलना होगा, घर घर यही गाना होगा”

या राष्ट्रसंतांच्या भजनातून सुवर्णाताईंनी समाजातील सध्याच्या परिस्थितीचे वास्तव मांडत आदर्श व्यक्तिमत्व व आदर्श समाज निर्मितीसाठी आवश्यक साधनांचा विचार मांडला. युवकांचे संस्कार,बाल संस्कार व्यसनमुक्ती, ग्रामस्वच्छता,सर्वधर्मसमभाव, मानवता, छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आदी सामाजिक विषयांवर सुवर्णाताईंनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले.

या कीर्तनावेळी गुरुकुंज आश्रमाचे सर्वाधिकारी श्री लक्ष्मणजी गमे सर, सरचिटणीस राजाभाऊ बोथे, मानवसेवा छात्रालयाचे अमोल बांबल सर, जिल्हा प्रचारक रुपलाल कावळे सर, अध्यक्ष संचालक मंडळ सौ पुष्पाताई बोढे ताई तसेच गुरुकुंज आश्रमातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.सर्व मान्यवरांनी सुवर्णाताईंच्या प्रभावी कीर्तन सेवेबद्दल त्यांचा सन्मान केला.

भद्रावतीच्या महिला कार्यकर्त्या गुरुकुंजपर्यंत पोहोचल्याबद्दल श्री गुरुदेव सेवा मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते विशाल गावंडे, गुणवंत कुत्तरमारे, मेश्राम महाराज, झनक चौधरी, गजानन डभारे, विवेक महाकाळकर विनोद रासेकर, कालिदास चेडे, नरेश दिवसें, ओमप्रकाश पांडे,शुभांगी कुत्तरमारे सोनाली गावंडे,उर्मिला बोन्डे, उषाताई आखाडे, शोभाताई खडसे आदींनी अभिनंदन केले.

तसेच श्री गुरदेव सुसंस्कार शिबीर समिती, गुरुदेव सेवा मंडळ भद्रावती राष्ट्रधर्म युवा मंच, झाडीबोली मंडळ,रोटरी क्लब भद्रावती, आस्थादायी कुणबी समाज आणि इतर सामाजिक संस्थांकडून सुवर्णाताईंच्या या उल्लेखनीय कीर्तन सेवेला भद्रावतीकरांकडून मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन मिळाले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये