ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती येथे उपजिल्हा रुग्णालय निर्मितीचा मार्ग मोकळा

आदिवासी विकास परिषदेच्या पाठापुराव्याला यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून या दवाखान्याचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे परिषदेचे प्रदेश महासचिव तथा आदिवासी सेवक केशव तिराणिक यांच्या नेतृत्वात आरोग्य मंत्रालय मुंबई यांचेकडे मागणी करण्यात आली होती.

त्यांच्या या पाठापुराव्याला यश प्राप्त झाले असून यासंदर्भात आरोग्यसेवा आयुक्तालयाकडून जिल्हा शल्य चिकित्सकांना तात्काळ अहवाल मागितला असल्याची माहिती परिषदेचे प्रदेश महासचिव केशव तीराणीक यांनी दिली आहे. यामुळे भद्रावती येथे 50 खाटांचे सर्व सुविधायुक्त उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या शहरात तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र ग्रामीण रुग्णालयाच्या मर्यादेमुळे येथे रुग्णांना आवश्यक त्या सुविधा मिळू शकत नसल्याने रुग्णांची हेळसांड होते. भद्रावती शहर तथा तालुका हा औद्योगिक क्षेत्र असून या परिसरात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे.

नेहमी होणारे अपघात तथा अन्य रोगराई यामुळे येथे रुग्णांची संख्या वाढलेली असून ग्रामीण रुग्णालयाच्या मर्यादेमुळे रुग्णांना आवश्यक त्या सुविधा मिळू शकत नाही. सदर रुग्णालयाचे श्रेणीवर्धन झाल्यास येथील रुग्णांना योग्य वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळू शकणार असल्याचे मत केशव तिराणीक यांनी व्यक्त केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये