सुभाष धोटेंच्या वाढदिवसानिमित्त महिला मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम
कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग, एकजुटीची भावना दृढ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर :- काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त गडचांदूर येथे आयोजित महिला मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाला कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळी ५ वाजता माजी उपनगराध्यक्ष सचिन भोयर यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमात स्थानिक महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
त्यापूर्वी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत राजुरा येथे अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात पार पडला. जिल्हाध्यक्ष सुभाष धोटेंना कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या. राजुरा विधानसभा क्षेत्रासह जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना दीर्घायुष्य व यशस्वी कार्यकाळाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी उपस्थितांनी माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या सार्वजनिक, राजकीय व सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांमध्ये एकजुटीची भावना दृढ झाली असून आगामी उपक्रमांसाठी नवचैतन्य प्राप्त झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
गडचांदूर येथील कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अरुण निमजे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सागर ठाकूरवार, विजय ठाकूरवार, काँग्रेस नेते विठ्ठल थिपे, नोगराज मंगरूळकर, शिवकुमार राठी, भीमराव मडावी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हंसराज चौधरी, नामदेव येरणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक बावणे, रऊफ खान, माजी नगराध्यक्ष सविता टेकाम, प्रा. हेमचंद दूधगवळी, माजी नगरसेवक पापय्या पोन्नमवार, आशाताई खासरे, किरनताई एकरे, प्रा. आशिष देरकर, डॉ. अंकुश गोतावळे, अभिजीत धोटे, रफीक निजामी, संतोष महाडोळे, शैलेश लोखंडे, उमेश राजुरकर, सुग्रीव गोतावळे, गणपत आडे, अमोल कांबळे, अहमद भाई, नामदेव जुमनाके, धनंजय गोरे यांसह विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक व कार्यकर्त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. संचालन अंजू ढेंगळे यांनी केले. चंद्रपूर येथील रजनी पॉल यांनी सूत्र संचालनातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.