ने.हि.महाविद्यालयाचे एम.ए (मराठी)चे तीन विद्यार्थी प्रथम, द्वितीय व तृतीय मेरिट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील शैक्षणिक सत्र २०२४-२५ ची विविध विषयाची गुणवत्ता यादी विद्यापीठाने नुकतीच जाहीर केली असून यामध्ये नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील एम. ए (मराठी) विषयाच्या गुणवत्ता यादीत पाचपैकी तीन विद्यार्थी नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील आहेत.
यामध्ये प्रथम मेरिट फराहनाज जब्बारखान पठाण(७६४-९.५५) ही प्रथम मेरिट असून स्नेहा विलास बनपुरकर(७६४-९.५५) ही द्वितीय मेरिट तर पियूष दामोदर बहेकर( ७६०-९.५०) हा तृतिय मेरिट आला आहे.
अंबिका मांढरे ही बी.ए.मधून मेरिट आलेली आहे.या सर्व विद्यार्थ्यांचे नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैया, प्राचार्य डॉ सुभाष शेकोकर, मराठी विभागप्रमुख डॉ.धनराज खानोरकर,डॉ.प्रकाश वट्टी,डॉ. पद्माकर वानखडे,स्वाती धनविजय याशिवाय समस्त प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.