सेवापंधारवाडानिमित्य, शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांना सहित्य साधनांचे वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
दिनांक 29.09.2025 रोजी पंचायत समिती कोरपना / तहसील अंतर्गत सेवा पंधरवाडा निमित्य, महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये पंचायत समिती/ तहसील येथील सर्व कर्मचारी व विभागप्रमुख उपस्थित होते. सदर शिबीरामध्ये शालेय शिक्षण घेत असलेले दिव्यांग विद्यार्थ्यांना मा. आमदार राजुरा क्षेत्र – देवराव भोंगळे यांच्या हस्ते समग्र शिक्षा समावेशित शिक्षण, शिक्षण विभाग पंचायत समिती कोरपना यांच्यामार्फत व्हिलचेअर, लहान-मोठे, कृचेस-कुबड्या, श्रवणयंत्र व शैक्षणीक साहीत्याचे” वितरण करण्यात आले.
सदर शिबिरामध्ये उपविभागीय अधिकारी, श्री माने साहेब, गट विकास अधिकारी बोबडे साहेब, तहसीलदार पल्लवी आखरे, मॅडम पोलीस निरीक्षक गडचांदूर कदम साहेब, गटशिक्षणाधिकारी विस्तारअधिकारी केंद्र प्रमुख व समावेशित शिक्षणातील कर्मचारी उपस्थित होते.