किन्ही येथील अतिवृष्टी ग्रस्तांना रेशन किट्स देऊन धीर देण्याचा प्रयत्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
किन्ही गावात व परिसरात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांत पुराचे पाणी घुसुन अन्नधान्याचे अंगावरचे अंथरूण पांघरण्याचे कपडे भिजून खराब झाले अशा नुकसान झालेल्या 50 कुटुंबांना रेशन किट वाटप करण्यात आल्या आहेत.
*सेंटर फॉर ॲग्रीकल्चर अँड डेव्हलपमेंट* , जालना मार्फत वाटप करण्यात आलेल्या रेशन किट्स मध्ये ५ किलो गहू पिठ,५ किलो तांदूळ, एक किलो साखर,दोन किलो रवा,मिरची,धने,हळदी पावडर मसाले एक लिटर तेल इ.वस्तूचा समावेश होता. रेशन किट्स गावचे प्रतिष्ठीत व्यक्ती मधुकर खरात, नारायण खरात तसेच गावचे उपसरपंच बद्री पवार व विराट हायब्रीड सीड्स कंपनी चे भारत खरात यांच्या हस्ते कुटुंबांना वाटप करण्यात आल्या. या रेशन किट्स उपलब्ध करून देण्यासाठी भारत खरात यांनी पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचे जिल्हा प्राथमिक शाळा किन्ही येथील मुख्यध्यापक बाबासाहेब विघ्ने यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशाखा खरात,आकाश खरात,विशाल खरात यांनी परिश्रम घेतले