अवैधरित्या दारुची वाहतुक
आरोपी अटकेत ; संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक २५.०९.२०२५ ते दिनांक २६.०९.२०२५ रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन यांचे आदेशाने सपोनि, आशिषसिंह ठाकुर, सोबत पोलीस अंमलदार हादवे, समीर, रवी यांचेसह शासकीय वाहनाने पुलगाव उपविभाग रात्रगस्त पेट्रोलींग करीत असतांना हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, समृध्दी महामार्गाने पुलगाव शहर कडे जात असतांना एक महिंद्रा कंपनीची XUV ५०० चारचाकी वाहन क्रमांक एम.एच.-०१/बि.एफ.-२००१ हे वाहन पुलगाव कडे जात असतांना पोलीसांचे वाहन पाहुन संशईतरित्या भरधाव वेगाने पळु लागले. त्यामुळे त्यांचा पाठलाग करुन पुलगाव कडे जाणाऱ्या रोडवर विरुळ गावाचे जवळ थांबवुन पाहणी केली असता वाहनामध्ये दोन इसम मिळुन आले.
त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) अभिषेश सुरेशराव बावीस्थळे, २) करण रविन्द्र ठाकुर दोन्ही रा. नांदगाव (खंडेश्वर), जि. अमरावती असे सांगीतले. त्यांना भरधाव वेगाने वाहन का चालविले याबाबत विचारपूस केली असता उडवा उडवीचे उत्तरे दिल्याने त्यांचे ताब्यातील चारचाकी वाहनाची झडती घेतली असता यातील नमुद आरोपीतांचे ताब्यात १) आयकोनीक व्हॉईट कंपनीची १८० एम.एल. विस्कीच्या ४८ बॉटल किं. १६,८०० रु., २) रॉयल स्टॅग कंपनीच्या १८० एम.एल. विस्कीच्या ३५ बॉटल कि. १२,२५० रु., ३) टुबर्ग कंपनीच्या ५०० एम.एल. बिअरच्या एकुण ७२ टिन कि. २१,६०० रु., ४) एक महिन्द्रा कंपनीची एक्सयुव्ही ५०० चारचाकी वाहन क्र. एम.एच. ०१/बि.एफ.-२००१ कि. ५,००,००० रु., ५) नथिंग कंपनीचा अड्रॉईड मोबाईल कि. १०,००० रु. असा एकुण जु.कि. ५,६०,६५० रु. चा माल मिळुन आला. यातील नमुद आरोपी हे अवैधरित्या दारुची वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने आरोपीतांविरुध्द पोलीस स्टेशन पुलगाव येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक, श्री. सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक आशिषसिंह ठाकुर, पोलीस अंमलदार राजेश हादवे, समिर कडवे, रवि खंडार यांनी केली.