क्राईम न्युजगुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्थानिक गुन्हे शाखेने एका आरोपीकडुन केल्या २ मोटार सायकल जप्त

एकुण १ लाख १० हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट

      दि. ११/७/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथक हे चंद्रपुर शहर परिसरात गुन्हेगार शोध कामी पेट्रोलींग करीत असतांना मुखबिर द्वारे खात्रीशिर खबर मिळाली की, प्रणय खोब्रागडे रा. पदमापुर जि. चंद्रपुर नावाचा इसम हा आकाशी रंगाचा शर्ट व काळया रंगाचा पॅन्ट घातलेला असुन तो बसस्टॉफ चौक चंद्रपूर येथे आपले ताब्यात एक काळा व लाल रंगाची हिरो कपंनीची स्पेल्डर मोटारसायकलची नंबर प्लेट पलटवुन तो विक्री करीता ग्राहक शोधत संशयास्पद फिरत आहे. अशी खबर मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन त्यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातील मोटारसायकलचे कागदपत्राबाबत विचारपुस केला असता उडवाउडवीचे व असमाधानाकारक उत्तरे देवु कोणतेही कागदपत्र नसल्याचे सांगीतले. त्यास विश्वासात घेवुन सविस्तर विचारपुस केली असता त्याने सदर गाडी ही अंदाजने आठ ते दहा दिवसापुर्वी एस.बि.आय. बँक शास्त्रीनगर चंद्रपुर येथुन चोरली असे सांगितल्याने तसेच आणखी दुसरी मोटारसायकल हि अंदाजे एका महिण्यापुर्वी राजुरा येथील रामनगर परिसरातुन एक बजाज पल्सर मोटारसायकल हि चोरली व ति मोटारसायकल पदमापुर जंगल परीसरात लपवुन ठेवली आहे असे सांगितल्याने पदमापुर जंगल परीसरातुन नमुद मोटारसायकल हि पंचासमक्ष जप्त पंचनाम्याप्रमाणे जप्त करण्यात आले ते 1) कि 50,000/- रू पोलीस स्टेशन रामनगर अप क 776 / 23 कलम 379 भादवी मधील एक काळा व लाल रंगाची हिरो स्पेल्डर मोसा. गाडी कं MH34 BJ2483 जिचा चेसीस क्रमांक MBLHAR070HHH01851, व ईजीन नं HA10GHHH01901 असलेली कि.अं. 2) कि 60,000/- रू पोलीस स्टेशन राजुरा अप क 372 / 23 कलम 379 भादवी एक काळया लाल रंगाची बजाज पल्सर मोसा. गाडी कं MH34 AH 1257 जिचा चेसीस क्र. MD2DHDJZZUCJ81996 व ईजीन नं DHGBUJ51130 असलेली कि.अं.असा एकुण 1,10,000/- रू चा मुद्देमाल जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करण्यात आला. वरील नमुद आरोपी व मुद्देमाल पोस्टे रामनगर येथे पुढील कार्यवाहि करीता ताब्यात देण्यात आले.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपुर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक साहेब चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली महेश कोंडावार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात पोलीस उप निरीक्षक विनोद भुरले, ना.पो.कॉ. संतोष येलपुलवार, पो.कॉ. नितीन रायपुरे, रविंद्र पंधरे, गोपाल आतकुलवार, नरेश डाहले यांनी केली असुन पुढील तपास पो.स्टे. रामनगर येथील पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये