ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कर्मयोगी गाडगे महाराज जयंती साजरी

वैज्ञानिक दृष्टिकोन देणारे गाडगे महाराज आजही प्रेरणादायी : नगराध्यक्ष प्रफुल चटकी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        दि.२३ फेब्रुवारी १८७६ रोजी विदर्भाच्या भूमीत डेबूजी जन्माला आले. बाल वयापासून शोषित दलीत, अपंग, गरीब, भेदाभेद, दांभिक रूढी परंपरा पाहत त्यांचे मन विषण्ण होत गेले त्यांनी घरादाराचा त्याग करून आपले संपूर्ण जीवन समाजाच्या शोषित घटकासाठी खर्ची घातले. “गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला चा गजर करीत स्वच्छतेसोबच लोकांचे अज्ञान, अंधश्रधा,दूर करण्यासाठी अहोरात्र झटले.

अश्या या निष्काम कर्मयोगी डेबूजी झिंगराव जानोरकर अर्थात गाडगे महाराज यांची जयंती भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १४ येथील गाडगे महाराज मंदिरात समाज बांधव व कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती तर्फे साजरी करण्यात आली.

याप्रसंगी अध्यक्ष म्हणून स्वीकृत तज्ञ नगरसेवक राजेश बदखल अध्यक्ष म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. प्रभागाच्या नगरसेविका कविता सावनकर, कल्पना भुसारी, व बांधकाम सभापती शोभा पारखी सह प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष प्रफुल चटकी, नगरसेवक मंगेश सोनुलकर आवर्जून उपस्थित होते.

सर्वप्रथम ग्रामसफाई करून ज्येष्ठ नागरिक व अतिथीच्या हस्ते गाडगे महाराज यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी गाडगे महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकीत स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. राजेश बदखल यांनी कर्मयोगी गाडगे महाराजांची शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणून स्वच्छता समितीच्या अभियानास सहकार्य करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे संचालन पत्रकार लिमेश माणूसमारे यांनी तर आभार प्रदर्शन क्षीरसागर मॅडम यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये