श्री. संत निरंकारी मंडळ भद्रावती तर्फे सत्संग व गुरुपूजा साजरी
परमात्म्याविषयी अनभिज्ञ राहणे ही मनुष्यासाठी फार मोठी हानी : सदगुरू स्वरूप श्री. हरिशजी निरंकारी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
श्री. संत निरंकारी मंडळ दिल्ली शाखा भद्रावती यांच्या वतीने आज दिनांक २३ रोजी भद्रावती येथे श्री. संत निरंकारी मंडळातर्फे क्षेत्रीय संघटक निरंकारी हरीशजी महाराज यांचे प्रमुख उपस्थितीत सदगुरू हरदेवजी महाराज यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला.यानिमित्ताने सत्संग व गुरुपूजा विधी करून उपस्थित भक्तगणांना आध्यात्मिक ब्रम्ह व आत्मज्ञान अवगत करून जीवन सफल करावे असे आवाहन करण्यात आले.
संत निरंकारी मिशनची स्थापना १९२९ मध्ये पाकिस्तानातील पेशावर येथे झाली होती. देशाच्या फाळणीनंतर बाबा अवतारसिंहजी यांनी भारतात येऊन १९६२ मध्ये मिशनची धुरा बाबा गुरुबचनसिंहजी व त्यांची सहचरनी निरंकारी राजमाताजी यांचेकडे सोपविली त्यांनी भारतासह ७१ देशात या मिशनची व्याप्ती वाढविली.२४ एप्रिल १९८० रोजी बाबा गुरुबचनसिंह यांचे बलिदानानंतर मिशन ची जबाबदारी निरंकारी बाबा हरदेवसिंहजी यांनी सांभाळली व मानवी जीवनाच्या परम लक्ष्याच्या प्रति मानवमात्राला जागृत करण्यासाठी व सामाजिक घडवून आणण्यासाठी अथक कार्य केले. असा इतिहास असणार हे मिशन ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान या आध्यात्मिक अनुभूती सह अनेक राष्ट्रीय कार्य, व सामाजिक कार्यात अग्रेसर असून ” स्वच्छ जल स्वच्छ मन” अंतर्गत भरीव योगदान देत असतात.
संत निरंकारी कोणताही धर्म अथवा संप्रदाय नसून एक आध्यात्मिक विचारधारा आहे. आत्मबोध हेच मानवी जीवनाचे परम लक्ष्य आहे. ईश्वर प्राप्तीद्वारेच विश्व बंधुत्व व शांतीची स्थापना होऊ शकते. परमात्मा एकच आहे परंतु अज्ञानामुळे मनुष्य परमात्म्याला आपापल्या कल्पनेनुसार भिन्न भिन्न रूपात पाहतो. सदगुरू प्रदत ब्रम्हज्ञान मानवाला आपल्या वास्तविक स्वरूपाचा बोध करून या सीमेच्या पलीकडे घेऊन जाते आणि अंतःकरणातील विशालता प्रदान करून सहज सरळ व आनंदमयी जीवन जगण्याची प्रेरणा देते. या उदात्त हेतूने या मिशनची वाटचाल सुरू असून याच शिकवणीचा एक भाग म्हणून सदगुरू माता सुदीक्षाजी यांचे शिकवणुकीतून शाखा भद्रावती येथे मोठ्या भक्तिभावात सत्संग व गुरुपूजा साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या यशस्विते करिता सेवादल व साथसंगत प्रमुख के. जी. माटे, मारुती डबरे, सचिन गेडाम, स्वप्नील क्षीरसागर, घोगरे परिवार पिंपळकर परिवार, विद्या वरारकर सुजाता धांडे, रूपा डोयेरणजीत काकडे, कुत्तरमारे परिवार आदींनी सहकार्य केले.



