ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूर येथे कर्करोग निदान शिबीर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

दिनांक 11 जुलै 2023 ला ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर, येथे ‘जागतिक लोकसंख्या’ दिनानिमित्त ‘कर्करोग निदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्य नगरपरिषद गडचांदूरच्या नगराध्यक्ष सविताताई टेकाम, नगर परिषद चे उपाध्यक्ष श्री शरद भाऊ जोगी, नगर परिषदेचे सदस्य मा श्री राहुल उमरे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्निल टेंभे, टाटा कॅन्सरचे फाऊंडेशन डॉ.आशिष बारबदे, जनरल मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन चे डॉ.कुलभूषण मोरे,डॉ. वैदेही लोखंडे, डॉ प्रवीण यरमे,डॉ मनीषा कन्नाके गडचांदूर आशा वर्कर व रुग्णालयीन कर्मचारी वृंद व यांचे कॅन्सर बाबत वेळीच निदान व्हावे याकरिता चित्रफित दाखवून प्रशिक्षण घेण्यात आले.

त्यामध्ये तंबाखू व सिगरेट मुळे होणाऱ्या मुखाच्या कर्करोगाबाबत,तसेच स्तनाच्या कर्करोगाबाबत व गर्भपिशवीच्या मुखाच्या कर्करोगाबाबत माहिती देण्यात आली. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले.

त्याचप्रमाणे डॉ. संजय गाठे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय,गडचांदूर, तसेच डॉ प्रवीण येरमे, वैद्यकीय अधिकारी व डॉ.स्वप्निल टेंभे,यांनी उपस्थितांना लोकसंख्या नियंत्रण ठेवण्याबाबत,तसेच कुटुंब नियोजनाचे विविध साधनांचा अवलंब करण्याबाबत मार्गदर्शन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये