ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे वैज्ञानिक दृष्टिकोन प्रबोधन कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

       जिल्हा परिषद पीएम श्री उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथे विद्यार्थ्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला

     कोरपना तालुक्यातील पीएम श्री दर्जा असलेली जिल्हा परिषद उच्च प्रथिमिक शाळा वडगाव येथे विद्यार्थ्याना श्रद्धा -अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर विद्यार्थ्यांना ज्ञान होण्यासाठी प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मनीषा उरकुडे होते तर प्रमुख मार्गदर्शक संतोष कुंदोजवार,प्रमुख अतिथी,उपसरपंच सुदर्शन डवरे,मुख्याध्यापक सखाराम परचाके, वनपाल मनोज वानखेडे, शिक्षक वीनायक मडावी,अनिल राठोड,योगशिक्षक सचिन सोनपित्तरे,शिक्षणप्रेमी कुंती आंबेकर, वैष्णवी ठाकरे उपस्थित होते

     यावेळी संतोष कुंदोजवार यांनी श्रद्धा अंधश्रद्धा यातील फरक सांगतानाच अंधश्रद्धेतून माणसाचे कसे फसवणूक होऊन शोषण होते भोंदू महाराज चमत्काराचे नावांनी कसे फसवितात ते प्रयोग व त्यामागील वैज्ञानिक कारण स्पष्टीकरण करून दाखविले विद्यार्थ्यानी चागला प्रतिसाद दिला मनोरंजनात्मक प्रबोधन करण्यात आले

       तसेच वनपरिक्षेत्र कार्यालय वनसडी चे वनकर्मचारी यांनीही यावेळी जल जंगल जमीन यांचे पर्यावरण सुरक्षित राहण्यासाठी असणारे महत्व सांगून जंगलाचे वन वणवा पासून संरक्षण करण्यासाठी जनजागृती वर मार्गदर्शन करण्यात आली

         कार्यक्रमाचे संचालन शिक्षक नितीन जुलमे यांनी केले यावेळी सर्व शिक्षक,विद्यार्थी,शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी,वन विभाग वनसडी उपक्षेत्रातील वनरक्षक,वनमजूर उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये