ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नेहाल खानचा 8 व्या वर्षी जीवनातील पहला रोजा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा येथील नेहाल खान नाज़ेर खान याने वयाचा आठवां वर्षी आपल्या जीवनातील पहिला रोजा (उपवास) धरला.
इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महीण्यात रोजा ठेवण्याचे महत्व आहे. या महिन्यतील 30 रोजे धरण्याची लहान मुलांना सवय व्हावी म्हणून चिमुकल्या मुलांकडून रोजे ठेवल्या जातात. नेहाल खान ह्या चिमुकल्यानेही वयाच्या आठव्या वर्षी आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केला. दिवसभर अन्नाचा एक ही कण न खाता तसेच पाणी न पीता चिमूकल्या नेहाल खान ने पहिला रोजा उपवास ठेवला. अल्लाह प्रति आपली श्रद्धा व्यक्त केल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



