श्रीगणेशा आरोग्याचा ४३ रुग्णांनी घेतला लाभ
लखमापूर गणेश मंडळाचा प्रेरणादायी उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
ग्रामीण भागातील गरजू रुग्णासाठी जय किसान आदर्श गणेश मंडळ,लखमापूर यांच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त मनोरंजनावर अवाढव्य खर्च न करता विविध प्रबोधनात्मक सामाजिक उपक्रम राबवून जय किसान आदर्श गणेश मंडळ,लखमापूर यांनी तरुणांमध्ये एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. महात्मा गांधी आयुर्विद्यान संस्थान, सेवाग्राम (वर्धा) येथे गरजू रुग्णासाठी एक दिवसीय मोफत वैद्यकीय उपचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले.
सेवाग्रामसाठी निघणाऱ्या रुग्ण सेवा बसचे पूजन माजी उपसरपंच मोरेश्वर आस्वले यांच्या हस्ते करण्यात यावेळी उमेश राजुरकर,नरेश सातपुते,कैलास कोरांगे सरपंच अरुण रागीट,अतुल धोटे अरुण जुमानके पोलिस पाटील संदीप तोडासे शुभम थिपे संदीप बावणे तथा ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.
या उपक्रमामध्ये लखमापूर येथील एकूण ४३ गरजू रुग्णांना थेट उपचार व आवश्यक ऑपरेशन प्रक्रियांचा लाभ देण्यात आला विशेष म्हणजे हे सर्व उपचार पूर्णतः विनामूल्य करण्यात आले. या शिबिरामध्ये सेवाग्राम येथील वैद्यकीय अधिकारी यांनी विविध आजारांसाठी वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, काही रुग्णांसाठी लघु शस्त्रक्रिया तसेच पुढील उपचारांसाठी योग्य मार्गदर्शनही देण्यात आले.
गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. प्रमुख उपस्थितीमध्ये मंडळाचे अध्यक्ष आर्यन टोंगे, उपाध्यक्ष अनिकेत उलमाले, सचिव आकाश भोजेकर तसेच सचिन आवारी, आदित्य आवारी, किरण चटप, वैभव उरकुंडे, वैभव भोयर, सौरभ जुनघरे, निशांत बोढे, पवन भोयर, अमित केसुरकर, आदित्य जुनघरे, हर्षल केसुरकर, अंकित पारखी, पंकज पोतराजे, अंकित तेलंग, अमर उलमाले, आशिष कौरासे, पवन बोबडे आदींचा समावेश होता.
शिबिर यशस्वी करण्यासाठी जय किसान आदर्श गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. गरजूंना मदत करणे, आरोग्याची जाण निर्माण करणे हेच मंडळाचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले. तसेच भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन नियमित करण्याचा मानस मंडळाने व्यक्त केला या उपक्रमाचे विशेष कौतुक ग्रामस्थांनी व लाभार्थी रुग्णांनी केले असून मंडळाचे हे कार्य खर्या अर्थाने प्रेरणादायी आहे.