ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शासकीय जागेवरील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू

अनेकांनी अतिक्रमण हटविल्याने मुख्याधिकारी देशमुख मॅडम यांचे अभिनंदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

 मात्र शहरातील अतिक्रमण हटविण्याची प्रमोद चौधरी मागणी करणार.

नागभीड नगर परिषद क्षेत्रात येणाऱ्या अनेक ठिकाणी अतिक्रमण प्रश्न हा दिवसा गणिक बिकट होत चालला असताना नव्याने रुजू झालेल्या मुख्याधिकारी देशमुख मॅडम यांनी शासकीय रस्त्यावरील अतिक्रमण काढून टाकण्याकरिता १५सप्टेंबर ते १७ सप्टेंबर पर्यंत स्वतः काढून टाकावे अन्यथा नगर परिषद प्रशासन अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करेल असे सूचित केल्याप्रमाणे आज सकाळी पोलिस बंदोबस्तात राम मंदिर ते जून बस स्थानक पर्यंत शासकीय जागेवरील रस्त्यावरील अतिक्रमण करण्यात आले.

यावेळी अनेक नागरिकांनी अतिक्रमण काढताना मुख्याधिकारी यांना शहरातील अतिक्रमण हटविण्याची मागणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी तक्रार न करता अतिक्रमण हटविल्याने अनेकांचे रोजगार बुडाले तरी अतिक्रमण हटाव मोहिमेचे मी स्वागत करतो पण शहरातील अतिक्रमण हटविण्याची मागणी मी करणार असल्याचे त्यांनी मुख्याधिकारी यांचेकडे अतिक्रमण हटविताना केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये