सांवगी मेघे पोलीसांकडुन गौण खनीज (रेती) चे अवैधरीत्या उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि. 19.09.2025 रोजी रात्रीचे सुमारास पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील डी.बी. पथक पो.स्टे परीसरात अवैध वाहतूक संबंधाने पेट्रोलींग करीत असता त्यांना मुखबिरकडून माहिती मिळाली की,
एका हिरव्या रंगाच्या ट्रॅक्टरमध्ये मौजा सुकळीबाई येथील धाम नदीचे पात्रातून काळी रेतीचा उपसा करून रेती अवैधरीत्या ट्रॅक्टरमध्ये भरीत आहे. अशा माहितीवरून पंच व पो.स्टाफसह मौजा सुकळीबाई येथील धाम नदीचे पात्राजवळ जावून पाहणी केली असता तेथे अवैधरीत्या रेतीचा उपसा करून रेती ट्रॅक्टरमध्ये भरीत असता दिसून आले, त्यावरून आरोपीचे ताब्यातून 1) एक हिरव्या रंगाचा प्रित कंपनीचा ट्रॅक्टर क एम.एच. 32 ए.एच 6455 व ट्रॅक्टरची ट्रॉली क. एम.एच. 32 ए.एस 4629 एकुण किं. 7,00,000/ रू. 2) अर्घा ब्रास (50 फुट) काळी ओलसर रेती किं. 3500/रू. असा एकुण जु.किं. 7,03,500/ रू. चा मुद्देमाल शासनाचा महसुल चुकवुन संगणमताने रेतीची (गौणखनीज) अवैद्यरित्या बिना पासपरवाना रेतीची चोरी करतांना मिळुन आल्याने आरोपी ट्रॅक्टर चालक 1) संजय भाउलाल गिरी वय 33 वर्ष रा. आंजी मोठी, ता.जि. वर्धा व ट्रॅक्टर मालक 2) रमेश रूपरावजी डबूरकर वय 49 वर्ष रा. आंजी ता. जि. वर्धा यांचे विरूध्द पो.स्टे. ला अप.क. 754/2025 कलम कलम 303 (2), 3(5) बि.एन.एस. सहकलम 48(7), 48(8) महा. जमिन महसूल अधि. 1966, सहकलम 4, 21 खान खनिज अधि. 1957, सहकलम 3(1), 181 मो.वा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद मकेश्वर साहेब, यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक श्री पंकज वाघोडे सा, ठाणेदार पोलीस स्टेशन सावंगी मेघे पोउपनि सतिष दुधाने व गुन्हे शोध पथकाचे पो.हवा संजय पंचभाई, अनिल वैद्य, निखील फुटाणे, हर्षवर्धन मून, अमोल जाधव, यांनी केलेली असून गुन्हयाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई हे करीत आहे.