शिक्षक दिनाच्या औचित्याने छोटूभाई पटेल हायस्कूलमध्ये शिक्षकांचा सत्कार सोहळा आयोजित

चांदा ब्लास्ट
छोटूभाई पटेल हायस्कूल माजी विद्यार्थी संघाच्या वतीने उद्या, दिनांक 13 सप्टेंबर 2025, सकाळी 9 वाजता शाळेच्या प्रांगणात “शिक्षक दिनाच्या औचित्याने शिक्षकांचा सत्कार सोहळा” आयोजित केला जाणार आहे.
या कार्यक्रमात शाळेतील आदरणीय शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार असून, खास पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी तथा राजुरा विधानसभेचे आमदार श्री देवराव भोंगळे उपस्थित राहणार आहेत.
माजी विद्यार्थी संघातर्फे शाळेत शिक्षण घेतलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिक्षकांच्या अमूल्य योगदानाला मान्यता देण्याची आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याची ही अनमोल संधी असल्याचे संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून शिक्षकांचा सन्मान करण्याचे विशेष महत्व असून, यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.