शासनाच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थानी नागरिकाचा सर्वागीण विकास करावा : आमदार करण देवतळे
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान एकदिवशीय कार्यशाळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभाग व जिल्ह्य परिषदेच्या मार्गदर्शनात पंचायत समिती भद्रावतीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा शहरातील जे.के. पॅलेस येथे घेण्यात आली. यावेळी आम.करण देवतळे यांनी शासनाच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थानी नागरिकाचा सर्वांगीण विकास करावा असे मत उद्घाटक पदावरून बोलताना व्यक्त केले.
कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून आमदार करण देवतळे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक गट विकास अधिकारी आशुतोष सपकाळ, प्रमुख अतिथी सहा.गट विकास अधिकारी डॉ.बंडु आकनुरवार, बाविप्रअ.पुनम गेडाम, सरपंच संघटना प्रतिनिधी सुधाकर रोहणकर, मंगेश भोयर, बंडू आत्राम, छाया जंगम, माजी नगराध्यक्ष अँड सुनिल नामोजवार, उप अभियंता ओमकेशव दराडे, पशुधन अधिकारी डाॅ.दिपक बिहानिया, ग्रामपंचायत संघटना जिल्ह्यध्यक्ष प्रकाश खरवडे, तालुकाध्यक्ष राजेंद्र गणवीर, आंगणवाडी संघटना अध्यक्ष कुसुम कळसकर होत्या.
यावेळी राष्ट्रसंत गाडगेबाबा,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार करण देवतळे यांनी उद्घाटनपर मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शक आशुतोष सपकाळ यांनी राज्य शासनाच्या निर्णयानुसार ग्रामीण भागात ग्रामपंचायतची कार्यक्षमता वाढविणे, सुशासन प्रशासन, मनरेगा योजना अभिसरण, सामाजिक न्याय, सहभाग व श्रमदानातून लोकसहभाग यासह मुद्देसूद मार्गदर्शन केले. यावेळी सुधाकरराव रोहणकर, डाॅ.बंडू आकनुरवार, पुनम गेडाम, प्रणाली भागवत यांनी विविध योजनेच्या माहितीसह अभियानाबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा.गट विकास अधिकारी डॉ.बंडु आकनुरवार,संचालन विस्तार अधिकारी प्रणाली भागवत,आभार विस्तार अधिकारी सांख्यिकी स्नेहल चार्लॅकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी गविअ आशुतोष सपकाळ यांच्या नेतृत्वात सगविअ डॉ.बंडु आकनुरवार, विस्तार अधिकारी प्रकाश पारखी, गुलाब चहारे, एपीओ सुरज खोडे, ग्रामपंचायत अधिकारी व पंंचायत समिती अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी,रोजगार सेवक, आंगणवाडी कार्यकर्ता, सिआरपी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.