ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खो-खो स्पर्धेत लोकमान्य विद्यालयाचे खेळाडू जिल्हास्तरावर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय तालुकास्तरीय खो खो स्पर्धा स्पर्धा विवेकानंद महाविद्यालय येथे पार पडल्या या स्पर्धेत लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथील 17 वर्षाखालील मुलांच्या संघाने तालुकास्तरावर दमदार कामगिरी करत विजयी मिळवून जिल्हा स्तरावर पोहोचले आहे.

17 वर्षाखालील हा विजय संघ यानंतर चंद्रपूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेत भद्रावती तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्हास्तरावर करणार आहे. विजयी संघातील खेळाडूंचे लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, शाळा समिती अध्यक्ष उल्हास भास्करवार, लोकसेवा मंडळाचे सचिव नामदेवराव कोल्हे सहसचिव अमित गुंडावार सदस्य गोपाल ठेंगणे, अविनाश पांपट्टीवार, उमाकांत गुंडावार संजय पारधे, माजी प्राचार्य सचिन सरपटवार, प्राचार्य रूपचंद धारणे, उपप्राचार्य प्रफुल वटे पर्यवेक्षक आशुतोष सुरावार, विशाल गावंडे तसेच मार्गदर्शिक राजकुमार हातझाडे , कु. प्राजक्ता चिखलीकर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृदांनी अभिनंदन केले. व पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये