ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दारुड्या पतीकडून पत्नीला मारहाण 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुक्यातील सावखेड भोई येथे एका दारुड्या पतीकडून पत्नीला जबर मारहाण केल्याची घटना 10 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजता घडली.

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी महिला सौ सविता इंगोले व आरोपी मोहन देविदास इंगोले हे पती पत्नी असुन यातील आरोपी हा दारु पिण्याचा सवयीचा असुन त्याने त्याची एच.एफ. डिलक्स मोटर सायकल परस्पर विकुन टाकली त्यामुळे पत्नीने पतीला विचारले असता त्याकारणावरुन आरोपी याने पत्नीला स्टिल पाइप असलेला झाडुने मारहाण करुन जख्मी केले आहे व पाहुन घेण्याची धमकी दिली आहे.

घटनेची तक्रार पत्नीने पोलिस ठाण्यात 11 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता दिली असून पोलिसांनी आरोपी पती विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस संजय गोरे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये