ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन तर्फे दहावीच्या विद्यार्था करीता उन्हाळी शिकवणी वर्ग सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, आवारपुर नेहमी आपल्या दत्तक गावाच्या विकासासोबतच नजीकच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या भविष्याकडे लक्ष देत आले आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवारपूर ने सी.एस.आर. च्या माध्यमातुन दिनांक १७ मे रोजी दहावी च्या विद्यार्थांकरीता उन्हाळी शिकवणी वर्गाचे उद्घाटन ए.बी.पी. शाळे मधे केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. नमित मिश्रा- उपाध्यक्ष, मानव संसाधन विभाग यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाला विभाग प्रमुख श्री. नारायण दत्त तिवारी, श्री. विपुल घायवाटे, ए.बी.पी. शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजीत सोनी उपस्थित होते. सोबतच सी.एस.आर. विभाग प्रमुख प्रतीक वानखेडे, शिकवणी वर्गाच्या शिक्षिका लांडगे मॅडम, पेशकर मॅडम व दिव्या मॅडम यांनी विद्यार्थांना संबोधित करतांना या वेळेसची शिकवणी वर्ग काय नविन असणार त्या बद्दल माहिती दिली.

हा कार्यक्रम यशस्वीतेकरीता संजय ठाकरे व देविदास मांदाळे यांनी अथक प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये