ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हास्तरीय जित- कुन- दो क्रीडास्पर्धेत स्किल डेव्हलपमेंट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा चमकदार ठसा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

     बुलडाणा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय जितकांदो क्रीडास्पर्धेत स्किल डेव्हलपमेंट अकॅडमी, देऊळगाव राजा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शालेय विभागीय जित- कुन- दो क्रीडास्पर्धेसाठी निवड झाली आहे.

क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेत राजेश खांडेभराड सर यांच्या मार्गदर्शनात स्किल डेव्हलपमेंट अकॅडमीचे विद्यार्थी 14 वर्षे खालील वयोगटात आर्यन पवार, आणि श्रीपाद चव्हाण, प्रथम तर व्दितीय क्रमांक कृत्तिका अतुरकर, निलेश शिवरकर आणि 17 वर्ष वयोगटात

48 वजन गटात मैथिली तायडे, 19 वर्ष वयोगटात 53 वजन गटात मयुरी थेटे, मुले 17 वर्ष वयोगटात 45 वजन गटात राघव झोरे , 48 वजन गट हरिओम रामाने, अरुण शिवरकर, यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे देऊळगाव राजाचे नाव जिल्हास्तरावर झळकले असून परिसरातून या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत असून पुढील विभागीय स्पर्धेत देखील विद्यार्थी उत्तम कामगिरी करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये