देऊळगाव राजा येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने मी धावतो मत चोरी रोखण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न
मुलामधून जालन्याचा वैभव शिंदे, तर मुलीमधून संभाजी नगर ची प्रियंका आक्सा प्रथम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मी धावतो मत चोरी रोखण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धा चे आयोजन 31 ऑगस्ट रोजी करण्यात आले, नगर परिषद शिवाजी महाराज विद्यालय ते माऊली पेट्रोल पंप पावेतो पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत धावपटू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिस व प्रमाणपत्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष डॉ राजेंद्र राख, जिल्हा सरचिटणीस रमेश दादा कायंदे, शहर अध्यक्ष आतिश कासारे, तालुका अध्यक्ष रामदास डोईफोडे, अनिल सावजी, हनीफ शहा, माऊली पेट्रोल पंप चे संचालक शेजुळ, गजानन पवार, राजेश इंगळे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आल.
या स्पर्धेत मुलामधून प्रथम क्रमांक वैभव शिंदे, उजैनपुरी जालना, द्वितीय आकाश राजपूत, शेंदुरजन, तृतीय नानाभाऊ पाटोळे,जालना, चतुर्थ ऋषिकेश शेजुळ यांनी पटकाविला मुलीमधून प्रथम क्रमांक प्रियंका आक्सा, संभाजीनगर, द्वितीय प्रतिक्षा टेहळे, अंबड, तृतीय जना वायसे, अंबड, रेणुका बोडखे, लातूर, प्रोत्साहनपर पुरस्कार जयश्री चाटे, समृद्धी काकड यांना देण्यात आला, याप्रसंगी,गणेश आडे,नासिर भाई, जनता सेवा आयुबभाई,प्रकाश राजे,, प्रा अशोक डोईफोडे, इरफान भाई,नासीर भाई, खेडेकर साहेब, बी आर गवई ,मुन्ना ठाकूर,यश कासारे,दिलीप भाई खरात, देविदास खरात, भिमराव चाटे,व इतर उपस्थित होते.