आमदार मनोज कायंदे यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांना पीक विमा ची रक्कम सप्टेंबर महिन्यात मिळणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
आमदार मनोज कायंदे यांच्या प्रयत्नाने प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 25 अंतर्गत तालुका निहाय मंजूर नुकसान भरपाई रक्कम सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे.
देऊळगाव राजा व सिंदखेड राजा तालुक्यांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप करण्यात येणार आहे.
देऊळगाव राजा तालुक्यातील एकूण29027 शेतकऱ्यांना 28,88,65,794 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे, यापूर्वी 12618 शेतकऱ्यांना 16,47,05,956 रुपये वाटप करण्यात आले आहे, उर्वरित 2520 शेतकऱ्यांना 2,85,38,498 रुपयांची नुकसान भरपाई सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे.
सिंदखेड राजा तालुक्यांतील 49195 शेतकऱ्यांना 71,02,59,379 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती, त्यापैकी 36791शेतकऱ्यांना 43,43,44,192 रुपये नुकसान भरपाई वाटप करण्यात आली असून, उर्वरित 9510 शेतकऱ्यांना 17,34,90,995 रुपयांची नुकसान भरपाई वाटप सप्टेंबर महिन्यात करण्यात येणार आहे.