आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूर येथे 16 सप्टेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

चांदा ब्लास्ट

 चंद्रपूर जिल्ह्यातील 10 वी, 12 वी  आय.टी.आय, पदविका इत्यादी  बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी  उपलब्ध करून देणे तसेच राज्यातील नामांकीत उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने 16 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता  महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूर येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करीअर सेंटर आणि  महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यामाने आायोजित या मेळाव्यातून 700 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार असून सदर मेळाव्यामध्ये 1. ओमॅट वेस्ट प्रा.लि. चंद्रपुर, 2. महाराष्ट्र कार्बन प्रा.लि. चंद्रपुर 3.गोपानी आयरर्न  ॲण्ड पॉवर इंडिया प्रा.लि. चंद्रपूर 4.डेक्सॉन  इंजिनिअर प्रा.लि. नागपुर 5.  सनफायर सिल्ड प्रा.लि. चंद्रपुर 6. वैभव इंटरप्रायझेस नागपूर 7. विदर्भ क्लिक वन सोल्युशन चंद्रपूर  8. जे.पि असोसिएट ॲन्ड लॅबोरेटरीज  प्रा. लि. चंद्रपूर 9 संसुर सृष्टी इंडिया प्रा.लि. चंद्रपूर 10 .एस.बी.आय.लाईक प्रा. लि. चंद्रपूर 11 .पटले  एज्यूस्किल प्रा. लि. नागपूर  इत्यादी कंपन्याचे विविध रिक्त पदे असल्याचे नियोक्तेकडून कळविण्यात आलेले आहे.

मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधार कार्ड, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे झेराक्स  प्रतीसह (कमीत कमी तीन प्रती) उपस्थित राहावे. अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता  मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर दुरध्वनी क्रमांक  07172 – 252295 येथे संपर्क करावा.

 जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी होण्याकरीता तसेच  रोजगार मेळाव्यात सहभागी उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर रिक्त पदे अधिसूचीत  करण्याबाबत सदर पोर्टल वर नोंदणी करण्याचे आवाहन सहायक  आयुक्त अ.ला.तडवी यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये