विद्यापिठस्तरीय अभंग गायन स्पर्धेत केतन नवघडे व्दितीय
राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाचे सुयश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत जगद् गुरु संत तुकाराम महाराज अध्यासन आणि श्री गोंविदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविघालय कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने, संत साहित्याच्या प्रचार प्रसारसाठी संत तुकाराम महाराज अभंग गायन स्पर्धां नुकतीच घेण्यात आली. या स्पर्धेत राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविघालय सावली येथील बी.कॉम द्वितीय वर्षाचा केतन पत्रु नवघडे यांनी तुकाराम महाराज यांचे विष्णुमय जग या अभंगाचे गायन करून द्वितीय क्रंमाक प्राप्त केला.
या यशाबदल संस्थेचे अध्यक्ष मा. संदिपभाऊ गड्डमवार, सचिव राजाबाळ पा.संगीडवार महाविघालयाचे प्राचार्य, डॉ. ऐ. चंद्रमौली, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.प्रफुल्ल वैराळे,डॉ.रामचंद्र वासेकर यांनी या यशाबदल केतनचे अभिनंदन केले. यापूर्वीही केतन इंदधनुष्य या राज्यस्तरीय सांस्कृतिक व युवा महोत्सवात गायन स्पर्धेत गोंडवाना विद्यापिठाचे प्रतिनिधित्व केला आहे. त्यांच्या या यशाबदल अभिनंदन केल्या जात आहे.