ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक आजपासून संपावर
तिन महिण्यांपासून मानधन थकीत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
दि. ३ आक्टोबर २०२४ रोजी ग्रामरोजगार सेवकांना आठ हजार रुपये मानधन व दोन हजार रुपये डेटा पैक देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता.
मात्र या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी झाली नाही व तिन महिण्यांपासून त्यांच्या खात्यात पैसेही आले नाही. त्यामुळे ग्रामरोजगार सेवकांवर ऊपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे शासनाच्या विरोधात राज्यातील ग्रामरोजगार सेवकांसोबतच तालुक्यातील सेवकांनी दिनांक ११ पासून बेमुदत आंदोलन सुरु केले आहे.
शासनाने ग्रामरोजगार सेवकांच्या खात्यात निर्णयानुसार त्वरीत मानधन व डेटा पैकची रक्कम टाकावी अशी मागणी ग्रामरोजगार सेवकांतर्फे करण्यात आली आहे. याविषयीचे निवेदन भद्रावती तालुका ग्रामरोजगार संघटनेतर्फे खा. प्रतिभाताई धानोरकर यांना सादर करण्यात आले आहे.