ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
युवकाने स्वतःच्याच शेतातील आंब्याच्या झाडाला दोर बांधून केली आत्महत्या ; कुणाडा येथील घटना
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील कुनाडा येथे राहणाऱ्या युवकांनी आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारला पहाटे दरम्यान उघडकीस आली याप्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.
संदिप केशव बेलखुडे वय ३६ वर्ष राहणार कुनाडा असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे हा युवक अविवाहित असून गेल्या काही दिवसापासून दारूच्या व्यसनाधीन झाला होता त्याने पहाटे दरम्यान कुनाडा येथील शेतात आंब्याच्या झाडाला दार बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.



