कामाचे क्लबिंग न करता वेगवेगळ्या निविदा काढा
राज्य अभियंता संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती नगर परिषदेतर्फे शहरातील छोट्या छोट्या कामांचे क्लबिंग करून या सर्व कामांची एकच निविदा काढली जात असल्यामुळे लहान ठेकेदारांवर अन्याय होत असून त्यांना कामे मिळत नाही. त्यामुळे या कामाचे क्लबिंग न करता या सर्व कामांच्या वेगवेगळ्या निविदा काढाव्या.
अशी मागणी राज्य अभियंता संघटनेतर्फे संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगदीश लवाडिया यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.कामांच्या क्लबिंग विरोधात संघटनेने मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती. त्यावर कामांचे क्लबिंग न करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला होता.
मात्र तरीही लहान मोठे कामांचे क्लबिंग करून सदर कामे एकाच ठेकेदाराला देण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे क्लबिंग न करता सर्व कामांच्या वेगवेगळ्या निविदा काढाव्या अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना राज्य अभियंता संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.