ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत शंभरपेक्षा अधिक गावात नळ योजनेची कामे सुरू आहेत मात्र वर्षभरापासून कामे पूर्ण करुनही कंत्राटदारांना देयके मिळाली नसल्याने कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आली आहे, संबंधित विभागाच्या सुचनेनुसार कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश मिळताच कामाला सुरुवात केली, सुरुवातीला कामाची देयके मिळाली त्यामुळे कंत्राटदारांनी पुढेही कामे सुरुच ठेवली अनेक ठिकाणी कामे शंभर टक्के तर कुठे ऐंशी ते नव्वद टक्के कामे पूर्ण होवूनही देयके मिळत नसल्याने कंत्राटदारांचा जिव मेटाकुटीला आला आहे.

चंद्रपूर जिल्हा परिषदेत जलजीवन मिशनचा निधी अपुरा पडत असल्याने पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी टक्केवारी घेऊन आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना देयके देत असल्याचा आरोप केला जात आहे.

संबंधित विभागाच्या टक्केवारीने जलजीवन मिशनच्या कामांना खीळ बसली असून परिणामी ग्रामीण भागातील नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित राहिले.

पहाडावर जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांनी तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेशातून मजूर आणून कामे पूर्ण केली मात्र कामाचे देयके मिळाली नसल्याने कंत्राटदारांकडे मजूरांना देण्यासाठी पैसेच नाहीत काही कंत्राटदारांनी उसनवारी करून कामे पूर्ण केली कंत्राटदारांवर कर्जाचा डोंगर उभा झाला आहे दुसरीकडे बांधकामासाठी रेती मिळत नसल्याने महागडी रेती खरेदी करून कामे पूर्ण करावी लागत असल्यामुळे कंत्राटदार कर्जाच्या खाईत लोटला जात आहे.

पहाडावर अनेक गावात पाणी टंचाईने उग्ररुप धारण केले आहे मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षाने जलजीवन मिशन हि योजना पाण्यात जाणार काय ?

जिल्हा परिषदेतील पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्ऱ्यांच्या देयके वाटपाच्या मनमर्जीमुळे पहाडावरिल कंत्राटदारांसमोर समस्यांचा डोंगर उभा टाकला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये