अनधिकृत मोबाईल टॉवरविरोधातील शिवसेनेच्या लढ्याला यश : प्रशासन झुकले!
आमदार करण देवतळे यांची आंदोलन स्थळाला भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहरातील गौतम नगर (स्नेहल नगर) येथे परवानगीशिवाय उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत मोबाईल टॉवर विरोधातील शिवसेना (शिंदे गट) तर्फे सुरू केलेल्या साखळी उपोषण आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.
हे आंदोलन शिवसैनिक सुरज शाहा यांच्या नेतृत्वाखाली दमदारपणे पार पडले.
आंदोलनस्थळाला आमदार करण देवतळे यांनी भेट देऊन आंदोलकांची भूमिका ऐकली. नागरिकांच्या भावना आणि शिवसेनेची ठाम भूमिका लक्षात घेऊन आमदारांनी संबंधित मोबाईल टॉवरचे काम तत्काळ थांबविण्यात येईल, परवानगीशिवाय टॉवर उभारणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. शिवसेनेच्या ठाम लढ्यामुळे प्रशासनाला झुकावे लागले आहे. आमदारांच्या विनंतीचा मान राखत आंदोलकांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले, मात्र गरज पडल्यास पुन्हा उग्र लढा उभारण्याचा इशाराही देण्यात आला.
हे आंदोलन यशस्वी ठरले असून, हा विजय सर्वसामान्य जनतेच्या हक्काचा आहे असे मनोगत शिवसैनिक सुरज शाहा यांनी व्यक्त केले.
यावेळी युवा शिवसैनिक सुमित हस्तक, महेश जीवतोडे, अर्चनाताई खंडाळे, लक्ष्मीबाई गेडाम, निर्मला पेटकर, धबुताई असूटकर, माधुरीताई फुकट, प्रियाताई तेलंग, सीमाताई वानखेडे, वैशालीताई चालखुरे, सरस्वती दानव, प्रतिभाताई नागपुरे, नंदाताई कोरडे, वैशालीताई तेलंग, नंदाताई ठमके, सिंधुताई देऊरकर, सुनिता ताई उताने, अरुण मत्ते, यशवंत उताणे, अशोक चिलके, मंगला अशोक चिलके, पुष्पा किशोर सीरसैया आंदोलनात सहभागी होते.