ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेनेच्या वतीने अनधिकृत मोबाईल टॉवर विरोधात साखळी उपोषण

मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती शहरातील गौतम नगर (स्नेहल नगर) परिसरात अनधिकृत मोबाईल टॉवरचे बांधकाम सुरू आहे. आधीच केवळ 100 मीटरच्या अंतरावर दोन मोबाईल टॉवर अस्तित्वात असून, आता तिसऱ्या मोबाईल टॉवरचे काम सुरू झाले आहे.

मोबाईल टॉवरमुळे निर्माण होणाऱ्या रेडिएशनचा सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. या धोक्याचा विचार करून नागरिकांनी वारंवार संबंधित शासकीय कार्यालयांकडे निवेदने दिली. परंतु अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही.

म्हणूनच आजपासून शिवसेना तर्फे नगर परिषद भद्रावती समोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. हे आंदोलन पूर्णपणे शांततामय पद्धतीने राबवले जाणार असून, नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण आणि अनधिकृत टॉवरचे काम तात्काळ थांबविणे ही शिवसेनेची व समस्त गौतम नगर (स्नेहल नगर) रहिवाश्यांनी प्रमुख मागणी आहे.

प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा शिवसेना शिंदे गटाकडून उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये