ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

२५ कृत्रिम कुंड व ३ फिरत्या विसर्जन कुंडात एकुण २९१७ मूर्तींचे विसर्जन

एकही पीओपी मुर्तीचा समावेश नाही

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात मूर्ती विसर्जनाच्या सोयीच्या दृष्टीने सुरु करण्यात आलेल्या 25 कृत्रिम कुंड व 3 फिरत्या विसर्जन कुंडात एकुण 2917 मूर्तींचे विसर्जन सोमवार 1 सप्टेंबरपर्यंत करण्यात आले आहे.

    शहरात दीड दिवस,दोन दिवस,पाच दिवसाच्या गणपतीचीही स्थापना करण्यात येत असल्याने त्या त्या दिवशी विसर्जन व्यवस्था सुरळीत ठेवण्याची गरज भासते. उत्‍सवादरम्‍यान होणारी गर्दी टाळण्‍याकरिता महापालिका प्रशासनातर्फे घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी झोननिहाय ‘फिरत्या विसर्जन कुंडांची’ व्यवस्था करण्यात आली आहे. सदर विसर्जन कुंड हे मनपा स्वच्छता विभागामार्फत नियमित स्वच्छ करण्यात येत असुन 25 निर्माल्य कलशांचीही स्वच्छता करण्यात येत आहे.

    या फिरत्या विसर्जन कुंडांसाठी झोननिहाय संपर्क क्रमांक महापालिकेद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मनपातर्फे पुरविण्यात आलेल्या या घरपोच सुविधेमुळे अत्यंत शांतीपूर्ण व भक्तिमय वातावरणात भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत.उभारण्यात आलेल्या 25 कृत्रिम कुंडात 2835 तर फिरत्या विसर्जन कुंडात झोन क्रमांक 1 मध्ये 42, झोन क्रमांक 2 मध्ये 20, झोन क्रमांक 3 मध्ये 20 अश्या एकुण 82 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. यात एकही पीओपी मुर्ती आढळुन आली नाही.

    मागील वर्षी पीओपीच्या मुर्तींचा वापर न करून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केले होते यंदाही श्रीगणेशोत्सवाच्या सुनियोजित आयोजनासाठी चंद्रपूर मनपा दक्ष असून भाविकांनीही पर्यावरणपुरक श्रीगणेशोत्सव संपन्न व्हावा याकरीता सहकार्य करण्याचे तसेच सर्व घरगुती व लहान मूर्तींचे विसर्जन कृत्रिम कुंडातच करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये