बुलढाणा जिल्ह्यातील युवा पिढी नशामुक्ती पासून दूर राहण्यासाठी सरसावले जिल्हा पोलीस अधीक्षक
संपूर्ण जिल्ह्यातील शहरी भागात पथनाट्याद्वारे सुरू केले नशा मुक्त अभियान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये नव्याने रुजू झालेले डायनामाईक पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी मिशन परिवर्तन अंतर्गत जिल्ह्यातील युवा पिढीने व्यसनापासून दूर राहावे यासाठी ठीक ठिकाणी पथनाट्यद्वारे नशा मुक्त अभियानाची जनजागृती करण्याचे काम सुरू केले असून सदर पथनाट्य हे *इनबिल्ट* कला असलेल्या कलाकारांनी एकत्र येऊन तयार केले आहे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, आठवडी बाजार, बस स्थानक परिसर अशा ठिकाणी पथनाट्यद्वारे सादरीकरण करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त असे की युवकांनी ज्या वयात शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेऊन आपले करिअर घडवावयास पाहिजे या वयातील बहुतेक युवक हे व्यसनाधीन होताना दिसून येत आहे यावर काही प्रमाणात का होईना आळा बसावा यासाठी नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे हे सरसावले असून मिशन परिवर्तन अंतर्गत पथनाट्यद्वारे नशा मुक्त अभियानाची जनजागृती जिल्हा भर करण्याचे नियोजन केले आहे शाळा, महाविद्यालय, आठवडी बाजार, बस स्थानक परिसरात पथनाट्यद्वारे उद्याचा भारत घडवण्याची क्षमता ठेवणारे युवकांनी अमली पदार्थ पासून दूर राहावे असा संदेश देण्यात येत आहे.
आज देऊळगाव राजा शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज नगर परिषद विद्यालय व बस स्थानक परिसरात पथनाट्यद्वारे जोरदार जनजागृती करण्यात आली. अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम बाबत सखोल माहिती देण्यात आली पथनाट्याच्या टीम सोबत पीएसआय सय्यद हारून, पोलीस शिपाई मधुकर रगड, कलाकार शुभम गवई,सिद्धेश सूर्यवंशी, अनिकेत चिकटे, अक्षय गायकवाड, रोहन झिने सहभागी झालेले आहेत.