ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जय शिवसंग्राम संघटनेच्या मागणीला यश

शिवाजी महाराज विद्यालयात उपलब्ध केल्या सुविधा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

जय शिवसंग्राम संघटनेच्या वतीने श्री शिवाजी महाराज नगर परिषद, हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील उर्दू विभागातील वर्ग खोल्यात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 30 जुलै 2025 रोजी न प. प्रशासक व मुख्याधिकारी अरुण मोकळ यांना निवेदन देण्यात आले, त्यांनी निवेदनाची दखल घेऊन तत्काळ कामाचे निर्देश दिले.

छत्रपती श्री शिवाजी महाराज न. प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयचे. मुख्याध्यापक संजय देशमुख यांनी तातडीने उर्दू विभाग या शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या, उर्दू विभागात सर्व वर्ग खोलीमध्ये लाईट फिटिंग, सिलिंग फॅन व ट्यूबलाइटची व्यवस्था करून दिली. तसेच शौचालय व बाथरूम मध्ये पाण्याची टाकी व सर्व नळ फिटिंग सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे.

उर्दू विभागातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होते.पालक वर्ग व मुस्लिम समाजाच्या वतीने तसेच जय शिवसंग्राम संघटच्या वतीने प्रशासक व मुख्याधिकारी अरुण मोकळ, यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये