कोरपना तालुकास्तरावरिल कला उत्सव मध्ये महात्मा गांधी विद्यालय सोनुर्लीचे घवघवीत यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
तालुका स्तरीय कला उत्सव स्पर्धा धानोली आश्रम शाळा येथे 28 ऑगस्ट रोजी पार पडल्या,त्यात महात्मा गांधी विद्यालय सोनुर्ली च्या चमुने चार स्पर्धामध्ये प्रथम व द्वितीय स्थान प्राप्त केले.
समुह गायन स्पर्धेत प्रथम स्थान, सिंग्सल डान्स मध्ये प्रेम देवगडे नी प्रथम स्थान, ऐकलं सिंगल गायन मध्ये द्वितीय स्थान, तर समूह डान्स मध्ये द्वितीय व दृश कलाकृती मध्ये निशाणे या विध्यार्थांनी द्वितीय स्थान प्राप्त केले. सर्व प्रथम स्थान प्राप्त केलेले चमू व प्रेम देवगडे 3 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय कला उत्सव मध्ये तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या प्रसंगी मार्गदर्शक शिक्षिका सलमा कुरेशी, स्पर्धक, यांचे पालक, व्यवस्थापक मंडळ,मुख्याध्यापक श्री बि. बि. भोयर,शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.