ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशी दारूच्या दुकानाला दिलेली एनओसी रद्द करण्यासाठी शेतकरी संघटनेचे अन्नत्याग बेमुदत उपोषण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना :- येथील नगरपंचायतीने देशी दारूच्या दुकानाला दिलेली एनओसी रद्द करावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनेने आजपासून बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, हे दुकान लोकवस्तीत (रेसिडेन्शियल एरिया) परिसरात येत असल्याने त्याचा समाजावर, विशेषतः विद्यार्थ्यांवर, वाईट परिणाम होऊ शकतो, तसेच नगरपंचायत प्रशासनाने दिलेले एनओसी हे नियम धाब्यावर ठेवून नियमांचे पालन न करता बांधकाम पूर्ण नसल्यावरही बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिलेच कसे असे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

प्रमुख मागण्या

नगरपंचायतीने देशी दारूच्या दुकानाला दिलेली एनओसी तात्काळ रद्द करावी. ना हरकत प्रमाणपत्र देण्यात अननियमितता करणाऱ्या

मुख्याधिकारी येमाजी धुमाळ यांना तात्काळ निलंबित करावे

 विशेषतः महिलांच्या सुरक्षेची दखल घ्यावी.

उपोषणकर्त्यांची भूमिका

शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष तसेच उपोषण करते पद्माकर नथुजी मोहितकर यांनी सांगितले की, “आम्ही अनेकदा नगरपंचायतीकडे याविषयी लेखी तक्रार केली आहे, पण प्रशासनाने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे आणि महिलांनाही अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे, जोपर्यंत एनओसी रद्द होत नाही, तोपर्यंत आमचे उपोषण सुरूच राहील.”

प्रशासकीय प्रतिसाद

या संदर्भात नगरपंचायतीच्या प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, स्थानिक पोलीस घटनास्थळी उपस्थित असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

पुढील पाऊल

शेतकरी संघटनेने इशारा दिला आहे की, जर त्यांच्या मागणीचा विचार झाला नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र केले चक्काजाम आंदोलन केले जाईल आणि राज्यातील इतर शेतकरी संघटनांचाही पाठिंबा मिळवला जाईल.

या आंदोलनाला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आबीत अली यांनी जाहीर पाठिंबा दिला

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये