विजासन येथील बुद्ध लेणी परिसरात शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी निर्णायक पुढाकार विषयावर कार्यशाळा संपन्न
समता सैनिक दल आणि डॉ. आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान यांचा संयुक्त उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आधारित “शैक्षणिक और आर्थिक विकास की दिशा में निर्णायक पहल” या विषयावर आधारित एक दिवसीय कार्यशाळा तथा प्रशिक्षण वर्ग दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी बुध्द विहार, विज्जासन लेणी परिसर, भद्रावती येथे मोठ्या उत्साहात, यशस्वीरित्या पार पडला. आंबेडकरी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीच्या दिशेने गंभीरपणे सतत प्रयत्नशील असलेले चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील प्रमुख प्रमुख मंडळी दोनशेच्या संख्येने उपस्थित होती.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मार्शल सुनिल सारिपुत (केंद्रीय संघटक, समता सैनिक दल) यांनी भूषविले. तर प्रमुख अतिथी म्हणून मार्शल ॲड. प्रकाश दार्शनिक (राष्ट्रीय बौद्धिक प्रमुख, समता सैनिक दल) उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान, अकोला तर्फे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.मुकुंद भारसाकडे, संस्थापक,अध्यक्ष रमेश तायडे, कोषाध्यक्ष, प्रा.डाॅ.गणेश बोरकर, माजी प्राचार्य आणि प्रा.अशोक इंगळे, अध्यक्ष यांनी उपस्थित राहून अत्यंत मार्मिक मार्गदर्शन केले. डॉ आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान अकोला च्या माध्यमातून उभारण्यात आलेले कोट्ट्यावधीचे अनेक शैक्षणिक प्रकल्प आणि अर्थिक विकासाचे अनेक प्रकल्प आजघडीला दिमाखात उभे आहेत. ते उभे करत असताना करण्यात आलेले क्रमबद्ध नियोजन, भविष्यातील वाटचाल या विषयानुषंगाने दिवसभर चाललेल्या विचार मंथनातून उपस्थितांमधुन अत्यंत आवश्यक आणि नाविन्यपूर्ण माहिती मिळाल्याची भावना व्यक्त केली.
सुत्रसंचालन मार्शल संदिप तायडे यांनी उत्तम प्रकारे पार पाडले. प्रास्ताविक मार्शल अविनाश दिग्विजय यांनी सादर करत या कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्देश व पार्श्वभूमी स्पष्ट केली. तर आभारप्रदर्शन मार्शल स्वप्निल खोब्रागडे यांनी मनोगत व्यक्त करून केले. या कार्यक्रमामध्ये कमांडिंग मार्शल हर्षल रामटेके यांनी केले.
समता सैनिक दल, युनिट भद्रावती, जिल्हा चंद्रपूर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा उपक्रम समाजातील शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरला.