ताज्या घडामोडी

विविध स्पर्धांनी साजरी केली शिवजयंती – विद्यार्थ्यांनी शिव व्याख्यान स्पर्धेत घेतला उस्फुर्त सहभाग

चनाख्यातील नागरिकांनी घरोघरी रेखाटल्या जाणत्या राजांच्या रंगात रांगोळ्या

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

महाराष्ट्राचे आराध्य, युगपुरुष, पराक्रमाचा महामेरू, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या जयंतीचे औचित्य साधुन राजुरा तालुक्यातील चनाखा गावात १९ फेब्रुवारी रोजी शिव उत्सव आयोजित करण्यात आला होता.  ह्या उत्सवानिमित्त रांगोळीस्पर्धा, शिवव्याख्यान स्पर्धा, रात्री सप्तखंजेरी वादक इंजी. भाऊसाहेब थुटे यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

गावातील नागरिकांनी आपापल्या घरा समोर जाणता राजाची रांगोळी रेखाटली होती, शाळकरी मुले, गावातील भजन मंडळ,  विविध संप्रदायाचे गावकरी शोभायात्रेत सहभागी झाले, शिवाजी महाराज, माँ जिजाऊ, मावळे यांच्या वेशभूषेने वेगळी रंगत आणली.

‘अ’ व ‘ब’ अशा दोन गटात झालेल्या शिवव्याख्यान स्पर्धेत अ गटातून प्रथम पुरस्काराचे मानकरी आकाश कडूकर, द्वितीय स्वाती मेश्राम तर तृतीय पायल वाळके ठरले. ब गटातून प्रथम पुरस्काराचे मानकरी महेश्वरी गिरडे, द्वितीय निधी चापले तर तृतीय प्रेरणा मडावी ठरले. स्पर्धेला परिक्षक म्हणून ॲड. अक्षय उराडे, प्रा. गणेश लोहे, विशाल शेंडे हे लाभले होते.

शिवाजी महाराज तैलचित्र व गावामध्ये गुरुदेव सेवा मंडळाच्या स्वागत फलकाचे अनावरण ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचे हस्ते, ॲड.राजेंद्र जेणेकर, ॲड.सारीका जेणेकर, रेखाताई आकनुरवार सरपंच, विकासभाऊ देवाळकर सभापती कृ.उ.बाजार समिती, राजुरा यांचे उपस्थितीत झाले. रात्री इंजी. भाऊसाहेब थुटे यांचा मनोरंजक, समाजप्रबोधनाचा कार्यक्रम नागरिकांच्या अलोट उपस्थितीत संपन्न झाला. संपूर्ण गावकऱ्यांनी स्नेहभोज आयोजित केला व शिवमहोत्सव समिती आणि गुरुदेव सेवा मंडळ यांनी यशस्वी आयोजन केले. शिवमहोत्सव यशस्वी करण्यात मुख्य भूमिका राहूल सातपूते, मोहन वडस्कर, प्रमोद वडस्कर, सुरज सातपूते, बाळू वडस्कर, राजेश सातपूते, अमोल देवाळकर, किशोर वानखेडे, भाऊराव आकनुरवार, सुरज सातपूते, शुभम सातपूते, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सत्रे, वाटेकर सर, प्रितम सातपूते, रणजित पाचभाई, वैभव वडस्कर, विशाल साळवे, ऋतीक देवाळकर, निखिल सातपूते, हिमांशू सातपूते यांनी मोलाची भुमिका बजावली. शिवव्याख्यान स्पर्धा व प्रबोधन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदीप कोंडेकर यांनी केले तर आभार के. एन. लांजेकर यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये