स्व. राजीव गांधी हे आधुनिक भारताचे शिल्पकार _ अशोक भैया : सद्भावना दिवस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :- माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधींनी आपल्या पंतप्रधान काळात अनेक बदल करुन आधुनिकतेचा स्वीकार केला.संगणक युग,तंत्रयुगाला चालना देऊन त्यांनी भारतीयांना अद्यावत केले.आजची मोबाईल क्रांती,संगणक युग हे त्यांची देण असून ते आधुनिक भारताचे शिल्पकार होत ” असे विचार नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोकजी भैयांनी व्यक्त केले.ते महाविद्यालयात स्व राजीव गांधी जयंतीनिमित्ताने सद् भावना दिवस कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात फोटोला माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सदस्य प्रा.जी.एन.केला,कार्य.प्राचार्य डॉ सुभाष शेकोकर उपस्थित होते.यानंतर उपस्थित डॉ रेखा मेश्राम, डॉ राजेंद्र डांगे, डॉ धनराज खानोरकर, डॉ असलम शेख,डॉ किशोर नाकतोडे, डॉ रतन मेश्राम,डॉ युवराज मेश्राम, डॉ प्रकाश वट्टी, डॉ पद्माकर वानखडे, डॉ वर्षा चंदनशिवे, डॉ योगेश ठावरी, अरविंद मुंगोले,डॉ हर्षा कानफाडे,डॉ सुनिल चौधरी, डॉ राजू आदे,प्रा बालाजी दमकोंडवार,डॉ.कुलजित शर्मा,प्रा धिरज आतला, अधीक्षक संगीता ठाकरे, डॉ ज्योती दुपारे,प्रा पराते, पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर, रोशन डांगे,प्रज्ञा मेश्राम, आलोक मेश्राम,रुपेश चामलाटे,सुषमा राऊत, खेमराज निनावे इत्यादींनी प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.यावेळी भारतीय छात्रसेना व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार डॉ युवराज मेश्रामांनी केले.यशस्वीतेसाठी समिती प्रभारी डॉ शर्मा,डॉ खानोरकर, प्रा आतला,जगदिश गुरनुले, प्रदीप रामटेकेंनी सहकार्य केले.