ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
ब्रम्हपुरी मनसेचे कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग नागपूर यांना निवेदन सादर
महामार्गाची दुरस्ती करा अन्यथा मनसे करणार रास्ता रोको आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी आरमोरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 डी पारडगाव फाट्यासमोर निलगिरी बार जवळील नहराच्या पुलीयावर मोठ मोठे खड्डे पडून त्या नहराच्या पुलाचे लोखंडी रॉड चार ते पाच फूट वरती निघून आहेत त्यामुळे त्या ठिकाणी अनेक अपघात झालेली आहेत.या खड्ड्यामुळे एखादा मोठा अपघात होऊन मोठी जीवित हानी होऊ शकते त्यामुळे त्या कामाची दुरुस्ती करून राष्ट्रीयमहामार्ग आठ दिवसात सुरळीत करावा.
अन्यथा मनसे रस्ता रोको आंदोलन करेल या संदर्भाचा निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना ब्रह्मपुरी तर्फे मा संजीव जगताप कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग नागपूर यांना त्यांचे नागपूर येथील कार्यालयात आज दिनांक १९ ऑगस्ट ला देण्यात आले.