ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मांडवा येथे विशाल हिंदू संमेलन 

हजारो नागरिकांची उपस्थिती : रथ यात्रेने वेधले लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना -सकल हिंदू समाजाच्या वतीने मांडवा येथे विशाल हिंदू संमेलन बुधवार दि. 7 जाने ला पार पडले.

या संमेलनात भव्य ज्ञानेश्वरी पारायण, ध्यानपाठ, सामुदायिक प्रार्थना, संत ज्ञानेश्वर महाराज रथयात्रा, कीर्तन, दहीहंडी काला व नंतर महाप्रसाद इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

सर्व हिंदू जातीपातीचा भेदभाव नष्ट करून आपल्या संस्कृतीचे रक्षण व सामुदायिक विकासाच्या दिशेने पाऊल उचलून हिंदू समाजाला नवीन दिशा व चेतना देण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

या संमेलनाचे अध्यक्षस्थानी ह.भ. प. मधुकर ठाकरे महाराज, प्रमुख अतिथी म्हणून कीर्तनकार ह. भ. प नत्थू महाराज कुमरे, सुकनेगाव, उपाध्यक्ष मधुकर पायघन, सचिव नागेश्वर. पिदूरकर, संयोजक सचिन मोहितकर, संजय वासेकर, विनायक मोहितकर तसेंच संमेलनाचे बौद्धिक वक्ते म्हणून विभाग सह-प्रचारक सागर अहेर, खंड प्रचारक योगेश सावंत,खंड-कार्यवाह कृष्णा वायकोर, खंड सह-कार्यवाह राजकुमार माणुसमारे प्रामुख्याने उपस्थित होते.

संमेलनाचे सूत्र संचालन बापूराव पैसेटवार यांनी केले. प्रास्ताविक ज्ञानेश्वर महाराज, व आभार कृष्णा सचिन मोहितकर यांनी मानले.

संमेलनात परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये