ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिस्तभंगाचा दणका ; मुख्याध्यापक रोहणकर अखेर निलंबित!

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : जिल्ह्यातील श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल, जुनासुर्ला येथे कार्यरत मुख्याध्यापक बंडू भाऊराव रोहणकर यांना नुकतेच संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाने पदावरून निलंबित केले आहे.

याबाबत सविस्तर असे की, संस्थेद्वारा संचलित श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल, जुनासुर्ला चे मुख्याध्यापक बंडू भाऊराव रोहणकर यांना दि. १९/१०/२०१७ रोजी संस्थेनी नियमित पदावर बढती दिली. तेव्हापासून सेवेत असताना गंभीर स्वरूपाची गैरवर्तणूक, कर्तव्यात बुद्धिपूरस्सर व सतत हयगय, मनमानी कारभार, शिस्तभंग करीत असून, सन २०२० ते २०२५ पर्यंतचे शाळेच्या जमाखर्चाचे ऑडिट न करणे, शाळेतील शिक्षक कैलास बोरकर गैरहजर असताना त्यांचे वेतन मंजूर करून शासनाची आर्थिक फसवणूक करणे, शाळा समितीच्या नियमित सभा न घेणे, शिक्षण सेवकाच्या नियमबाह्य नेमणुका करून शासनाचे आर्थिक नुकसान करणे, पदाधिकाऱ्यांना शाळेत येण्यास मज्जाव करणे, कर्मचाऱ्यांना संस्थेच्या विरोधात भडकावणे, कारणे दाखवा नोटीस चा खुलासा न करणे याबाबत त्यांचेविरुद्ध असलेल्या आरोपांची चौकशी करण्याकरिता दि. ०८/७/२०२५ रोजी त्यांना आरोपाचे अभिकथन पाठविण्यात आले. परंतु निर्धारित मुदतीत त्यांनी स्पष्टीकरण सादर केले नाही.

त्यामुळे विभागीय चौकशी सुरू असताना ते मुख्याध्यापक पदावर कार्यरत असल्यास शाळेतील महत्वाच्या कागदपत्रांचा पुरावा गहाळ करण्याची शक्यता असल्याने संस्थेच्या कार्यकारी मंडळाने दि. ०८/०८/२०२५ रोजी त्यांना निलंबित करण्याचा ठराव बहुमताने पारित केला. त्यानुसार संस्थेचे सचिव सुधीर गोवर्धन यांनी महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी [ सेवेच्या शर्ती ] नियमावली १९८१ चे नियम ३५ [१] अन्वये मुख्याध्यापक बंडू रोहणकर यांना दि. १४/०८/२०२५ पासून पदावरून निलंबित केले आहे. तरी विद्यार्थी, पालकांनी याची नोंद घेऊन मुख्याध्यापक रोहणकर यांचेशी शाळेशी संबंधित कोणताही व्यवहार करू नये असे आवाहन संस्थेच्या कार्यकारी मंडळाने केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये