ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाकवी वामनदादांचे विचार घरोघरी पोहचले पाहिजे – ऍड. योगिता रायपूरे 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.प्रशांत रणदिवे

“भीमा तुझ्या मतांचे जर पाच लोक असते,तलवारीच्या तयांचे न्यारेच टोक असते” वामन दादांच्या विचारांचे पाच लोक अध्याप निर्माण झाले नाहीत,ही खंत नेहमी बोचत राहील…वामन दादांना अपेक्षित चळवळ आपण निर्माण करू शकलो नाही,ही खंत नेहमी राहील,असे मत ऍड. योगिता रायपूरे यांनी व्यक्त केली. प्रसंग होता महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती निमित्त आयोजित कवी संमेलनाचा…

      दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वतंत्र दिन तथा महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती निमित्त आंबेडकर युथ या समाजिक संघटनेने बल्लारपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत कवी संमेलन तथा आंबेडक्रवादी कार्यकर्त्यांचा गौरव आयोजित केला होता.कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवयत्री,वक्ता तथा समाजिक,शैक्षणिक कार्यकर्त्या ऍड. योगिता रायपूरे यांनी जबाबदारी सांभाळली होती.

तर आंबेडकरी चळवळीवर वर्तमान भाष्य करणारे सूत्रसंचालन कवी,साहित्यिक,पत्रकार नरेंद्र सोनारकर यांनी केले.या कवी संमेलनात वामनदादा कर्डक यांच्या कवितांवरही चिंतन,मंथन करण्यात आले…एका पेक्षा एक अशा कविता प्रेक्षकांना ऐकायल्या मिळाल्या…प्रेक्षकांची दाद मिळालेल्या या कवी संमेलनात वरिष्ठ कवी अरुण लोखंडे,संगीता बांबोळे,,सीमा भसारकर,विश्वास देशभ्रतार,गौतम कळसकर,प्रीती वेलेकर यांनी एकापेक्षा एक कविता सादर केल्या.प्रेक्षकांनी सर्वच कवितांना भरभरून दाद दिली.दरम्यान कवी संमेलनाच्या अध्यक्षा ऍड.योगिता रायपूरे यांनी आपल्या दोन कविता सादर करत केल्या,तथा झालेल्या कवितांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केले.

        दरम्यान बल्लारपूर शहरातील आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला.वामनदादा कर्डक यांच्या क्रांतिकारी गीतांनी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

        कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय चौहाण,सुधाकर खैरकर यांच्या मार्गदर्शनात ऍड.प्रियांका चौव्हाण,कशिश बेले,शुभम चिकाटे,संकुल झाडे,अमर गोंडाने,दिक्षा चौव्हान,श्रेया वाळके,एकता भगत,प्रियंका दुपारे,बादल ताकसांडे,सुमित नगराळे यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये