ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हास्तरीय मैदानी खेलो इंडीया प्रशिक्षण केंद्राकरीता खेळाडू निवड चाचणी

चांदा ब्लास्ट

खेलो इंडीया सेंटर अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपुर येथे जिल्हास्तरीय मैदानी खेलो इंडीया अनिवासी प्रशिक्षण केंद्राकरिता सन 2025-26 या सत्राकरिता खेळाडू निवड चाचणीने आयोजन 12 ऑगस्ट 2025 रोजाी जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आलेले आहे.

वयोगट 14 वर्षे आतील मुले/मुली यांची निवड चाचणी 12 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता होईल. यासाठी इच्छुक विद्यार्थ्याचा जन्म 1 जानेवारी 2012 किंवा त्यानंतरचा जन्म असावा. 16 वर्षे आतील मुले/मुली -यांची निवड चाचणी 12 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता होईल. यासाठी संबंधित खेळाडूचा जन्म 1 जानेवारी 2010 किंवा त्यानंतरचा जन्म असावा. या चाचणीकरीता उंचीला प्राधान्य देण्यात येईल. सर्व खेळाडूंनी स्वतःच्या पुर्ण तयारीने यावे. प्रशिक्षण केंद्र हे अनिवासी आहे. आधारकार्ड व जन्मदाखला प्रत सोबत आणावे.

उपरोक्त निवड चाचणी करिता जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी आपली नावे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत नोंदणी करावे. अधिक माहितीकरिता क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड ( मो. नं.9423673232) व खेलो इंडीया प्रशिक्षक रोशन भुजाडे (मो.नं. 7798174435) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये