ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अरुणाचल प्रदेश वन विभागातील 49 वनपालांचे पायाभूत प्रशिक्षण पूर्ण

चांदा ब्लास्ट

विविध राज्यांतील वन विभाग तसेच इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी चंद्रपूर येथे वन अकादमीची स्थापना करण्यात आलेली आहे. याच दृष्टीने अरुणाचल प्रदेश शासनाने त्यांच्या वन विभागातील 49 वनपालांना 6 महिन्यांच्या पायाभूत प्रशिक्षणासाठी चंद्रपूर वन प्रबोधिनी येथे पाठविले. या प्रशिक्षणात 39 पुरुष व 10 महिला, असे एकूण 49 वनपाल प्रशिक्षणार्थी अरुणाचल प्रदेश या राज्यातून तसेच 3 पुरुष प्रशिक्षणार्थी महाराष्ट्रातून असे एकूण 52 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले.

6 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 4 ऑगस्ट 2025 रोजी दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले. समारंभात सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी पासिंग आऊट परेड सादर केली. या परेडचे निरीक्षण महाराष्ट्र वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख शोमिता बिश्वास, तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक (संवर्धन) व वन अकादमीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी केले. यावेळी अरुणाचल प्रदेश प्रशिक्षण संस्थेचे संचालक प्रेम कुमार, विभागीय वन अधिकारी मितो रोमी, तसेच चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), रामानुजम आर. एम. आणि चंद्रपूर वन अकादमीचे अपर संचालक (प्रशिक्षण) उमेश वर्मा, अपर संचालक (मुख्यालय) मनिषा भिंगे आदी उपस्थित होते.

यावेळी विभागीय वन अधिकारी ज्योती पवार यांनी वनपाल प्रशिक्षणार्थींनी पूर्ण केलेल्या प्रशिक्षणाबाबत आढावा सादर केला. यामध्ये शैक्षणिक प्रशिक्षणाबरोबरच दिलेल्या सुविधा आणि विदर्भ व दक्षिण भारत अभ्यास दौ-याच्या विशेष बाबी अधोरेखित करण्यात आल्या. यावर वनपाल प्रशिक्षणार्थींनी मनोगत व्यक्त करतांना प्रशिक्षण कालावधीत मिळालेल्या अध्ययनाचे व प्रशिक्षण व्यवस्थेचे कौतुक करून वन अकादमीचे अभार मानले,.

शेवटी सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 52 वनपालांना प्रमाणपत्रे, तसेच विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना पदके देऊन गौरविण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये