ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
म्हसीच्या अंगावर विज पडून म्हैस ठार
तालुक्यातील कचराळा शेतशिवारातील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शेतशिवारात पाळीव जनावरे चरीत असताना अचानक विज अंगावर पडल्याने एका म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक ६ ला दुपारच्या सुमारास तालुक्यातील कचराळा येथील शेतशिवारात घडली.
म्हैस मृत्युमुखी पडल्याने म्हैस मालकाचे जवळपास पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर म्हशीची नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी म्हैस मालक रामदास बळी नरुले यांनी केली आहे. नरुले यांनी आपली पाळीव जनावरे चरण्यासाठी गावालगतच्या शेतशिवारात नेली असता दुपारच्या वेळेस अचानक मेघगर्जनेसह व विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.
यावेळी विज अंगावर पडल्याने दुभत्या म्हशीचा घटनास्थळीच मृत्यू झाला.